1) 1 चमचा कच्ची हळद जिभेवर/घशा जवळ ठेऊन ती हळू हळू लाळे सोबत गिळावी, त्यावर 1तास काहीही खाऊ अथवा पिऊ नये, दिवसातून 1/2/3 वेळा केले तरी चालेल
2) जर घास infection मुळे दुखत असेल तर 1 चमचा धने घेऊन ते तोंडामध्ये टाकावे, आणि चावून चावून त्याचा लाळे सोबत रस बनवावा आणि नंतर तो रस हळू हळू गिळावा, याच्यामुळे घासा दुखणे लगेच कमी होते आणि infection पण जाते, नंतर राहिलेला चोथा थुंकून टाकावा,
3) जर कोरडा खोकला सारखा सारखा येत असेल तर
खाऊचे/विड्याचे एक पान घेऊन त्यात अर्धा किंवा 1चमचा
ओवा(ajwine) ठेऊन ते पान चावून चावून त्याचा रस करून हळू हळू गिळावे (सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपताना केले तर उत्तम)
4) 1ग्लास (200ML)पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे हळद मिक्स करून 5 ते 7 मिनिट ते पाणी उकळावे आणि नंतर गाळून घ्यावे, नंतर पाणी हलके गरम झाल्यावर त्यात 5/6 लिंबाचे थेंब टाकून हे पाणी हळू हळू प्यावे(दिवसातून 2 वेळा करावे)
5) 1इंच आल्याचा/अद्रक चा तुकडा गॅसवर 2 ते3मिन चांगला गरम करून घ्यावा, चांगला गरम झाल्यावर तो तुकडा लगेच हळदी मध्ये टाकून त्याला पूर्ण हळद लावून तो तुकडा हलका गरम असताना चावून चावून खवा, याने घशाला चांगला शेक मिळतो आणि घशातील cugh कमी होऊन खोकला पण कमी होतो
6) घशात इन्फेकॅशन आणि छातीत खूप cugh झाला असेल
1गुळाचा तुकडा आणि 1चमचा ओवा रात्री जेवण झाल्यावर चावून चावून खावा,
7)लहान मुलांना छातीत cugh झाला असेल तर काकवी खायला द्यावी, काकवी नसेल तर गुळ खायला घ्यावा, गुला सोबत सुंठ दिली तर उत्तमच, काकवी/गुळामध्ये फॉसफरस खूप असल्याने cugh लवकर बरा होण्यास मदत होते
Note: ज्यांना पित्ताचा खूपच त्रास आहे किंवा 12वर्षा पेक्षा लहान मुले किंवा गरोदर महिला यांनी हळदीचा वापर कमी करावा, हळद ही गरम असते त्यामुळे आशा लोकांनी हळदीचा वापर जास्त आणि सारखा सारखा करू नये
No comments:
Post a Comment